महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महापरिक्षा पोर्टल' बंद करण्यासाठी अमरावतीत विद्यार्थ्यांचा मोर्चा

विद्यार्थी कृती समिती प्रमुख किशोर जाधव यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मोर्चादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

अमरावती

By

Published : Aug 22, 2019, 2:44 PM IST

अमरावती- शासनाच्या विविध विभागात पदभरतीसाठी महापरिक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा प्रक्रियेत अनेक घोळ असल्याने सरकारने महापरिक्षा पोर्टल त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी अमरावतीत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.

'महापरिक्षा पोर्टल' बंद करण्यासाठी अमरावतीत विद्यार्थ्यांचा मोर्चा

गाडगेनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात जिल्ह्यतील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. शासनाने सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्या, किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारखे स्वतंत्र आयोग नेमण्यात यावे, परीक्षेच्या आवाजवी शुल्कात कपात कराव,. महापरिक्षेत पदांकरिता घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीला आवर घालवा, परीक्षा केंद्रातील गैरकारभार व बेशिस्तीपणावर कठोर कारवाई व्हावी, जिल्ह्यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसता यावे, ऑनलाइन परीक्षा बंद करून सर्वांचा एकच पेपर एकाच दिवशी असावा, योग्य तज्ञांकडून परीक्षा प्रक्रिया राबवावी, एखाद्य परीक्षेत आधारकार्डची डुप्लिकेट प्रत परिक्षारत्याकडे असली की त्याला परिक्षेपासून वंचित न ठेवता त्याच्याकडून लेखी हमीपत्र घेऊन परीक्षेला बसू द्यावे, आशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.

विद्यार्थी कृती समिती प्रमुख किशोर जाधव यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. मोर्चादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

ABOUT THE AUTHOR

...view details