अमरावती -जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील सेफला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वकौशाल्यातून पर्यावरणपूरक गणपती साकारला. यामध्ये झाडांच्या बिया, धान्य, डाळी, वाळू, शंख, शिंपले आदींचा वापर करून पर्यावरण बचावचा संदेश देण्यात आला.
अमरावतीतील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून साकारला पर्यावरणपूरक गणपती
अमरावतीतील धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थ्यांनी स्वकौशल्यातून पर्यावरणपूरक गणपती साकारला आहे. तसेच त्यामागे 'चंद्रझेप' असे लिहून 'चांद्रयान-२' मोहिमेचे अभिनंदन केले आहे.
सेफला हायस्कूलमध्ये गेल्या ९१ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यामुळे जलप्रदूषाची समस्या निर्माण झाली. तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता या शाळेने पर्यावरणपूरक गणपती तयार केला आहे. तसेच त्यामागे 'चंद्रझेप' असे लिहून 'चांद्रयान-२' मोहिमेची अभिनंदन केले आहे. दरम्यान याठिकाणी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते.
अमरावतीला १२४ वर्ष जुन्या गणपती मंदिराचा वारसा, गणेशोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी