महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊनमुळे खोळंबली राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी हैराण - विद्यार्थी

मंगळवारपासून सुरू झालेली अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, स्थापत्य आदी शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सर्व्हर डाऊन असल्याने खोळंबली आहे.

अमरावीतीमध्ये सर्व्हर डाऊनमुळे खोळंबली राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी हैराण

By

Published : Jun 19, 2019, 4:47 PM IST

Updated : Jun 19, 2019, 5:52 PM IST

अमरावती- मंगळवारपासून सुरू झालेली अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, स्थापत्य आदी शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सर्व्हर डाऊन असल्याने खोळंबली आहे. राज्य सामाईक प्रवेश कक्षा मार्फत ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सर्व्हर डाऊन संकटामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. त्यानंतर आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सर्व्हर संथगतीने सुरु झाली आहे.

अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊनमुळे खोळंबली राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थी हैराण

यावर्षीपासून राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. मंगळवारी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने विविध केंद्रांवर प्रवेशासाठी पोहोचलेल्या विद्यार्थी आणि पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षाच्या आयुक्तांनी प्रवेश प्रक्रियेशी संबंधित सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र तपासणीचे काम मंगळवारी बंद राहील. तसेच प्रमाणपत्र तपासणी कालावधी 22 जून पर्यंत वाढविण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

दरम्यान, बुधवरी दुपारी 3 वाजेपर्यंतही सर्व्हर सुरळीत न झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत रोष व्यक्य केला. पोटे अभियांत्रिकी व फार्मसी महाविद्यालय, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, विद्याभर्ती फार्मसी महाविद्यालय, राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गोडे अभियांत्रिकी महाविद्यालय, अशा सर्वच अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी महाविद्यालयात अमरावतीसह जिल्ह्याभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Last Updated : Jun 19, 2019, 5:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details