महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Truck Accident Amaravati: डुलकी लागली अन् भरधाव ट्रक भिंत तोडून शिरला विद्यापीठाच्या आवारात - अमरावती विद्यापीठात ट्रक अपघात

भरधाव वेगात असणारा 16 चाकी ट्रक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची भिंत तोडून थेट विद्यापीठाच्या आवारात शिरला. शुक्रवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.

Truck Accident Amaravati
ट्रक अपघात

By

Published : May 27, 2023, 4:41 PM IST

विद्यापीठाच्या आवारात शिरलेला ट्रक

अमरावती :मार्डी या गावाच्या दिशेकडून सोळा चाकांचा हा ट्रक भरधाव वेगात अमरावतीकडे येत होता. दरम्यान ट्रक चालकाला डुलकी आल्यामुळे भरधाव वेगात असणारा ट्रक दोन मोठी झाडे आणि विद्यापीठाची भिंत तोडून थेट विद्यापीठाच्या आवारात शिरला. या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले. ट्रकचा पुढील भाग हा भिंतीच्या आतमध्ये जाऊन फसला तर उर्वरित भाग भिंतीच्या बाहेर अडकला. हा अपघात इतका भीषण होता की, रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास परिसरातील रहिवासी भागात मोठा आवाज आला.

ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर:अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाल्यामुळे विद्यापीठातील सुरक्षा रक्षक तसेच परिसरातीलच रहिवासी घटनास्थळी धावून आले. अपघाताची माहिती तात्काळ फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. फ्रेझरपुरा पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी धावून आले. जखमी झालेल्या ट्रक चालक आणि क्लीनरला ट्रकच्या बाहेर काढून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फ्रेझरपुरा पोलीस या घटनेचा तपास करीत आहे. दरम्यान विद्यापीठाच्या भिंतीचा मोठा भाग तुटल्यामुळे त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाने आता सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.

चारचाकी-ट्रक अपघातात कुटुंब ठार: नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने 6 जानेवारी, 2021 रोजी भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारमध्ये प्रवास करत असलेले तिघांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत हे एकाच कुटुंबातील आहेत. अपघातामधील मृत हे नागपूरच्या दिघोरी परिसरातील पंचवटी नगर येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. डॉ. बाबुराव श्रावण भुरे (६२) त्यांची पत्नी वंदना बाबुराव भुरे (५०) व मुलगा गणेश बाबुराव भुरे (२५) आणि मृतांची नावे आहेत. हा अपघात नागपूर- अमरावती मार्गावरील धामणा शिवारातील इंडियन पेट्रोल पम्पनजिकच्या अमरजीत ढाब्यासमोर घडला आहे.

हेही वाचा:

  1. SDRF Rescues Youth In Kedarnath : केदारनाथला स्टंट करणे आले अंगलट; सुमेरु पर्वतावर अडकलेल्या तरुणाची एसडीआरएफकडून थरारक सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details