अमरावती - महाराष्ट्र परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही या वातानुकूलित बसचे अपघात सत्र सुरूच आहे. ही बस नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. दरम्यान, नांदगाव खंडेश्वर बसस्थानकातही असाच एक अपघाती प्रसंग समोर आला आहे.
या बसस्थानकामध्ये शिवशाही बसच्या एका चाकाला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी जीव मुठीत धरून बस बाहेर पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी दुपारी घडली. शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.