अमरावती- तेलाच्या किंमतीवरून सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यामध्ये तेलाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी जे युद्ध सुरू आहे. त्या अंतर्गत सौदी अरेबियाने तेलाच्या किमती या पंचवीस टक्क्यांनी कमी केल्या आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी झाल्या आहे. 55 डॉलरमध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती आज 35 डॉलरवर येऊन थांबली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 5 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे, असे मत आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले आहे.
सौदी अरेबिया हा भारताला पेट्रोल, डिझेल पुरवणारा देश आहे. त्यामुळे किंमती कमी होण्याचा परिणाम आपल्या देशावर दिसून येईल. तेलाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर सौदी अरेबियाने वाढवले आहे. त्याचा परिणाम देखील आपल्याला तेलाच्या किंमतीच्या माध्यमातून दिसून येईल.