अमरावती - जिल्ह्यातील तिवसा वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता अनिल वसूले यांना अधीक्षक अभियंत्याने कार्यालयात येऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर उपकार्यकारी अभियंता दोन महिन्याची रजा टाकून रजेवर गेले आहेत. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून घडलेला प्रकार सांगितला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ४ जुलैला उपकार्यकारी अभियंता म्हणून अनिल वसुले यांची नियुक्ती झाली. महिन्याभराच्या कालावधीत त्यांनी ग्राहकांकडील ७० टक्के थकबाकीची वसुली केली. अनिल वसूले यांची काम करण्याची पद्धत उत्तम होती, अशी चर्चा आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अमरावती येथून अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे हे तिवसा वीज वितरण कार्यालयात आले. या दरम्यान तिवसा वीज अभियंता अनिल वसूले हे मोझरी येथील विज वितरण कार्यालयात होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आल्याने अनिल वसुले काही वेळातच तिवसा कार्यालयात हजर झाले.