महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनाची दुसरी लाट येतेय.. अमरावतीकरांनो सज्ज रहा'

कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज आरोग्य विभागासह जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला असून दुसरी लाट सर्वांनाच महागात पडणार असल्याचा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

second wave of corona is comming
अमरावती कोरोना

By

Published : Nov 21, 2020, 4:46 PM IST

Updated : Nov 21, 2020, 4:54 PM IST

अमरावती -कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य विभागासह जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात इशारा दिला आहे. सध्या अमरावतीत जिल्ह्यात 70 ते 80 कोरोना रुग्ण दररोज आढळून यायला लागले आहेत. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावतीकरांनो सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

कोरोनासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी
दीड महिना सतर्कतेचा -सण उत्सवांचा काळ आता संपला असून लग्न समारंभाची धामधूम आता सुरू होईल. याच काळात आता कडाक्याची थंडी पडणार असल्याने हृदय आणि यकृताचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी कोरोनापासून बचावासाठी अधिक काळजी बाळगणे अत्यावश्यक राहणार असून थंडीचा दीड महिना सतर्कतेचा राहणार, असे जिल्हाधिकारी म्हणाले.चाचण्या पुन्हा वाढवल्या -मध्यंतरी कोरोना चाचणीचे प्रमाण मंदावले असताना आता पुन्हा एकदा चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. सर्दी, ताप असणाऱ्या प्रत्येक रुग्णांनी कोरोना चाचणी करावी. आता कोरोना चाचणीसाठी कोणत्याही डॉक्टरच्या पत्राची गरज नसून कोणत्याही व्यक्तीला तपासणी केंद्रावर जाऊन कोरोना चाचणी करता येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात 17 हजार 212 रुग्ण -अमरावतीत आज 99 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या 17 हजार 212 झाली आहे. सध्या 10 कोविड रुग्णालयांसह जिल्ह्यातील एकूण 16 कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये एकूण 1,423 खाटांपैकी 1,266 खाटा रिक्त असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.शाळा पूर्णवेळ नाही -सोमवारपासून नववी ते बाराव्या वर्गापर्यंत शाळा सुरू होणार असल्या तरी ही शाळा पूर्णवेळ नसणार. गणित, विज्ञान या विषयात विद्यार्थ्यांना असणाऱ्या अडचणी सुटाव्या यासाठी शाळा सुरू होणार आहे. एक दिवस एक वर्ग दुसऱ्या दिवशी दुसरा वर्ग अशी शाळा सुरू होईल. दिवसभर शाळा न राहता दोन-तास शाळा राहील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
Last Updated : Nov 21, 2020, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details