अमरावती- 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' अशा घोषणा देत अमरावती शहरात हजारोच्या संख्येत महामोर्चा निघाला. सरकारचे अति आरक्षण धोरण हे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आड येणारे असून यामुळे राष्ट्रहिताला अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने आपले धोरण बदलावे या मागणीसाठी शहरात रविवारी 'सेव्ह मिरीट सव्ह नेशन' संघटनेच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला.
'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'साठी अमरावतीत महामोर्चा; खुल्या प्रवर्गातील गुणवंतांचे नुकसान - agitation in amravati
सरकारचे अति आरक्षण धोरण हे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीत आड येणारे असून यामुळे राष्ट्रहिताला अडसर निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने आपले धोरण बदलावे या मागणीसाठी शहरात रविवारी 'सेव्ह मिरीट सव्ह नेशन' संघटनेच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला.
'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे संस्थापक अनिल लद्धड यांच्या मार्गदर्शनात दसरा मैदान येथून राजापेठ-राजकमल चौक मार्गे हा महामोर्चा नेहरू मैदान येथे धडकला. या महामोर्चात हिंदू, मुस्लीम, शिख अशा सर्व धर्मातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या आरक्षण धोरणामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार शाळा-महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. व्होट बँकेसाठी सरकार चुकीचे धोरण राबवित आहे. आज खुल्या प्रवर्गातील 2% गुणवंत विद्यार्थ्यांनाही त्यांना हवी असलेली संधी उपलब्ध नाही. या चुकीच्या प्रकाराला आळा बसावा यासाठी हा खुल्या प्रवर्गातील जनतेचा मोर्चा अमरावतीत काढण्यात आला आहे. शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, असे 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'चे संस्थापक अनिल लाद्दड हे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
केंद्र सरकारच्या 'सबका साथ सबका विकास' या धोरणाचाही यावेळी निषेध नोंदवण्यात आला. मोर्चादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. या महामोर्चामुळे बडनेराकडून अमरावती शहरात येणारी वाहतूक राजापेठ उड्डाणपुलावरून वळविण्यात आली होती.