अमरावती - "छत्रपती शिवाजी महाराजांचा मी वारस आहे. छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरचा झालेला सर्वांगीण विकास असा आमच्या कुटुंबाचा भक्कम वारसा असतानाही २००९ च्या निवडणुकीत मी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक हरलो. मात्र, त्यानंतर खऱ्या अर्थाने २०१३ साली घराबाहेर पडलो आणि खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. शिवाजी महाराजांचा वारस आपल्या घरी येत असल्याचा आनंद लोकांना वाटायचा. माझी ही मेहनत आणि कष्ट पाहून २०१६ साली पंतप्रधान मोदी यांनी मला खासदार म्हणून संधी दिली." असे खासदार संभाजी राजे अमरावतीत म्हणाले.
माझे कष्ट, मेहनत पाहून मोदींनी दिली खासदारकी - संभाजी राजे - NARENDR MODI
शनिवारी सायंकाळी डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवा मंच आणि अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन येथे सृष्टी देशमुखचा नागरी सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला खासदार संभाजी राजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
धामणगाव तालुक्यातील सृष्टी देशमुख ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचव्या क्रमांक मिळवला. शनिवारी डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवा मंच आणि अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन येथे सृष्टी देशमुखचा नागरी सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला खासदार संभाजी राजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवल आणि रेशीम संचालनालयाच्या आयुक्त भाग्यश्री बानाईत प्रामुख्याने उपस्थित होत्या.
संभाजी राजे पुढे म्हणाले, "मला माझ्या परिश्रमाचे फळ म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेत खासदार केले. आपल्याला यश येईल अथवा नाही मात्र आपण आपली चिकाटी, परिश्रम सतत सुरू ठेवायला हवेत फळ निश्चित मिळतेच." असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.