अमरावती -ओबीसीची जनगणना व्हावी व ओबीसी समाजाचे आरक्षणाल धक्का लावू नये, यासह ओबीसींच्या विविध या मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यात मराठासमाजासह कुठल्याही जातीला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. परंतु आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, तसेच जोपर्यंत सरकार आमच्या मागणीची दखल घेत नाही. तोपर्यंत छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर असेच तीव्र आंदोलन करू, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत समता परिषदेचा मोर्चा - obc agitation in amravati
ओबीसींच्याा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसीसमाजातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी -
गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी महासंघाकडून विविध प्रकारची आंदोलने केली जात आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जनगननेत ओबीसी समाजात असलेल्या जातींची जातनिहाय जनगणना करावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा लवकर घ्यावी, नोकरभरती सुरू करावी, या मागण्याकरीता काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना ही निवेदन देण्यात आले होते.