अमरावती -गेल्या ४२५ वर्षाची पालखीची परंपरा असलेल्या अमरावतीच्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी मंगळवारी सकाळी पंढरपूरला रवाना होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता एका वाहनाने आषाढी एकादशीनिमित्त ही पालखी पंढरपूरसाठी रवाना करण्यात येईल. मंगळवारी या पालखीचे पूजन करण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर उपस्थित राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौंडण्यपूरमध्ये भाविकांनी गर्दी न करता घरुनच माता रुक्मिणीचे दर्शन घेण्याचे आवाहन कौंडण्यपूर मंदिर प्रशासनाने भाविकांना केले आहे.
मंगळवारी रुक्मिणीच्या पालखीचे वाहनाद्वारे पंढरपूरला होणार प्रस्थान; पालखीला ४२५ वर्षांची परंपरा
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला मोठा सोहळा पार पडत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील मोजक्याच काही पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील एकमेव कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी मंगळवारी पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे.
उद्या रुक्मिणीच्या पालखीचे वाहनाद्वारे पंढरपूरला प्रस्थान
दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला मोठा सोहळा पार पडत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील मोजक्याच काही पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील एकमेव कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी मंगळवारी पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. दरम्यान, दरवर्षी या पालखीसोबत ३०० पेक्षा जास्त वारकरी पायी जातात. मात्र, यावर्षी मोजक्याच वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.