अमरावती -देशात बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नसून देशात बेरोजगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अमरावतीत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर सायंकाळी युवासंवाद प्रतिष्ठाण अमरावती द्वारा आयोजीत युवासंवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकांच्या नौकऱ्या गेल्या आहेत. आता मात्र राज्य सरकार युवकांच्या रोजगारासंदर्भात मोठ्या उद्योग व्यवसायकांशी चर्चा करत आहे. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देऊन युवकांना रोजगार उपलब्ध होईल, या दिशेने राज्यसरकार प्रयत्नशील असून राज्य सरकारचे धोरण युवकांबद्दल सकारात्मक असल्याचे रोहित म्हणाले.
हेही वाचा -पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे लोकार्पण; मात्र, चव चाखणे टाळले
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेकांच्या नौकऱ्या गेल्या आहेत. आता मात्र राज्य सरकार युवकांच्या रोजगारासंदर्भात मोठ्या उद्योग व्यवसायकांशी चर्चा करत आहे. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देऊन युवकांना रोजगार उपलब्ध होईल, या दिशेने राज्यसरकार प्रयत्नशील असून राज्य सरकारचे धोरण युवकांबद्दल सकारात्मक असल्याचे रोहित म्हणाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला.