अमरावती -राष्ट्रीय महामार्गावर नागपूरमार्गे येणाऱ्या भरधाव वाळू ट्रकने आईशर ट्रकला धडक दिल्याची घटना घडली. ही धडक एवढी मोठी होती की धडकेनंतर आईशर ट्रक पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
भरधाव वाळू ट्रकची आयशर ट्रकला धडक; सुदैवाने जिवितहानी नाही - jalna road accident
तिवसा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून रोजच शेकडो ट्रकने नागपूर मार्गे वाळूची वाहतूक होते. सुसाट धावणाऱ्या या ट्रकमुळे अनेकदा अपघात होतात.
महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात वाढ-
तिवसा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून रोजच शेकडो ट्रकने नागपूर मार्गे वाळूची वाहतूक होते. सुसाट धावणाऱ्या या ट्रकमुळे अनेकदा अपघात होतात. अशातच आज सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान नागपूरवरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 27एक्स 6105 माल घेऊन जात असताना मागून येणाऱ्या एका मोठ्या वाळूच्या ट्रकने जोरात धडक दिली. या धडकेत आयशर ट्रक पलटी होऊन ट्रकचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवितहानी झाली नसून ट्रक चालक सुखरूप आहे. घटनास्थळी तिवसा पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरु आहे.