अमरावती-बडनेरापासून काही अंतरावर भातकुली तालुक्यात येणार्या उत्तम सराव गावालगत एका कोरड्या विहिरीत गुरुवारी दुपारी नीलगाय पडली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कोरड्या विहिरीत पडलेल्या निघायला बाहेर काढून तिला जीवनदान देण्यात आले.
विहिरीत पडलेल्या नीलगायला वनविभागाच्या बचाव पथकाने दिले जीवनदान
उत्तमसरा येथे एका शेत शिवारात असणाऱ्या कोरड्या विहिरीत गुरुवारी नीलगाय पडली. विहिरीत नीलगाय असायची माहिती दुपारी परिसरातील काही लोकांना मिळाली. त्यानंतर या विहीर परिसरात गावातील ग्रामस्थांची गर्दी उसळली होती.
हेही वाचा-चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता - निलेश राणे
उत्तमसरा येथे एका शेत शिवारात असणाऱ्या कोरड्या विहिरीत गुरुवारी नीलगाय पडली. विहिरीत नीलगाय असायची माहिती दुपारी परिसरातील काही लोकांना मिळाली. त्यानंतर या विहीर परिसरात गावातील ग्रामस्थांची गर्दी उसळली. ही माहिती वन विभागाला देण्यात आली. वनविभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कोरड्या विहिरीत जाळी टाकून विहिरीत अडकून बसलेल्या नीलगायला अलगद बाहेर काढून लगतच्या जंगलात सोडून दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी सय्यद सलीम यांच्या नेतृत्वात राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेत प्रभारी वनपाल अमोल गावनेर, वनरक्षक मनोज माहुलकर यांच्यासह वीरेंद्र उज्जैनकर, सतीश उमक मनोज ठाकूर, आसिफ, प्रशांत खाडे, जांभुळकर,पंडित राऊत आदी सहभागी होते.