महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोर्शीतील पुरातून सुरक्षित स्थळी हलवलेल्या गणरायाची पुन्हा स्थापना, व्हिडिओ व्हायरल - अमरावती पाऊस बातमी

अमरावतीच्या मोर्शीमध्ये मुसळधार पावसामुळे नळदमयंती नदीला आलेल्या महापूराच्या पाण्यातून एका मंडळातील महादेवाच्या पिंडीवर विराजमान गणपतीला कार्यकर्त्यांनी सुरक्षी बाहेर काढले. याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. या गणपतीची पुन्हा त्याच जागी स्थापना करण्यात आली आहे.

पुरातून सुरक्षित स्थळी हलवलेल्या गणरायाची पुन्हा स्थापना

By

Published : Sep 6, 2019, 11:49 PM IST

अमरावती -अमरावतीच्या मोर्शीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी नळदमयंती नदीला महापूर आला होता. यात शेकडो घरांचे नुकसान झाले. याशिवाय जनावरे, पैसा, धान्य पुरात वाहून गेले. अशातच अनेक घरांतील गणपती जागेवर विरगळले तर तीन मंडळाचे गणपती हे पुरात वाहून गेले. दरम्यान एका मंडळातील महादेवाच्या पिंडीवर विराजमान असलेला गणपती पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे पाहत मंडळाच्या काही तरूणांनी जीवाची पर्वा न करता, पुरात उतरून गणपतीला सुरक्षित स्थळी घेऊन गेले. पुरातून गणपतीला सुरक्षित स्थळी नेतानाचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला होता. आता पुन्हा त्या गणपतीची त्याच ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. आपला जीव धोक्यात टाकून आपल्या लाडक्या बाप्पाला सुरक्षित स्थळी नेणाऱ्या तरुणांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी.

पुरातून सुरक्षित स्थळी हलवलेल्या गणरायाची पुन्हा स्थापना

ABOUT THE AUTHOR

...view details