अमरावती - खरीप हंगामात सोयाबीन, मूग व उडीद निघाल्यानंतर आता या मोकळ्या क्षेत्रावर रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे, थंडी रब्बीला पोषक असून जमिनीत पुरेशी आद्रता असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता खरीप हंगामातील नफा तोटा विसरून अमरावती जिल्ह्यातील बळीराजा पेरणीला लागला आहे,विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात हरभरा व गहु पिकांची लागवड करतात.
यंदा अमरावती जिल्ह्यात रब्बी मध्ये दीड लाख हेक्टर क्षेत्र हरभराचे राहणार आहे, तर ५०हजार हेक्टर गहू पिकांचे राहणार आहे. ट्रॅक्टर द्वारे शेतकरी राजा पेरणी करत आहे. यंदा चांगला झाला आहे त्यामुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणावर ओल आहेत, त्यामुळे रब्बी हंगामासाठी दिवाळीतही शेतकऱ्यांचा उत्साह दिसून येत आहे, तर जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी तर अति पावसामुळे बुरशी जिवाणू वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी गावागावात शेतकऱ्यांना जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खर्चाण यांनी दिली आहे.
रब्बीसाठी 93,940 मेट्रिक टन खतांंचे नियोजन -