अमरावती- पावसाळा सुरू झाल्यामूळे साप आता बाहेर येऊ लागले आहेत. अशाच २ अजगरांना एका विहीरीतून सुखरुप बाहेर काढून मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी जीवदान दिले.
विहीरीतून काढून २ अजगरांना जीवदान, सर्पमित्रांनी शर्थीचे प्रयत्न करून सोडले जंगलात - अजगर
पावसाळा सुरू झाल्यामूळे साप आता बाहेर येऊ लागले आहेत. अशाच २ अजगरांना एका विहीरीतून सुखरुप बाहेर काढून जंगलात सोडले.
अजगर पकडून जंगलात सोडताना सर्पमित्र
आज दुपारी अमरावतीच्या तिवसा येथील एका शिवारातील विहीरीत साधारणपणे ४ फूट लांबीचे २ अजगरांचे पिले पडले होते. याची माहिती शेतकऱ्यांनी तिवसा येथील सर्पमित्र शुभम विघे याला दिली. या सर्पमित्रांनी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनतर दोन्ही अजगरांना विहिरीतून बाहेर काढले. नंतर त्या अजगराला जंगलात सुखरूप सोडून दिले. यावेळी सर्पमित्र अविनाश पांडे यांनी तिवसा वनविभागात अजगराची नोंद केली आहे.