अमरावती Pune Amravati Special Train :पुण्यात राहणाऱ्या हजारो अमरावतीकरांना दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी खास सुविधा व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं 10 नोव्हेंबर ते 11 फेब्रुवारी दरम्यान पुणे-अमरावती-पुणे ही विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. या गाडीच्या एकूण 186 फेऱ्या होणार होत्या. मात्र शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावर या गाडीनं घरी परत येण्यासाठी प्रवासी पोहोचले असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक अपरिहार्य कारणामुळं गाडी रद्द करण्यात आल्याचा मेसेज आला. या मेसेजमुळं प्रवासी प्रचंड हादरले. या गाडीसाठी घोषित करण्यात आलेल्या सर्वच फेऱ्या आता रद्द करण्यात आल्यानं रेल्वे प्रशासनावर प्रवाशांचा प्रचंड रोष उफाळून येत असल्याचं पाहायला मिळतंय.
Pune Amravati Special Train : प्रवाशांची तारांबळ! पुणे-अमरावती विशेष रेल्वे ऐनवेळी झाली रद्द - Pune Amravati Special Train News
Pune Amravati Special Train : खास दिवाळीनिमित्त सुरू करण्यात आलेली पुणे-अमरावती ही विशेष गाडी ऐनवेळी रद्द झाल्यामुळं प्रवाशांची तारांबळ उडत आहे. पुण्यावरून अमरावतीला येणाऱ्या प्रवाशांना ऐनवेळी रेल्वेकडून गाडी रद्द झाल्याचा मेसेज आला. तसंच अमरावतीवरून परत जाण्यासाठी ज्यांनी तिकीट आरक्षित केलं त्यांना देखील यासंदर्भात मोबाईलवर संदेश देखील पाठवण्यात आलेत. त्यामुळं प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय.
Published : Nov 11, 2023, 3:34 PM IST
खानदेश आणि विदर्भातील प्रवाशांची गैरसोय :पुण्याहून अमरावतीसाठी घोषित करण्यात आलेली ही विशेष रेल्वे उरळी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथून अमरावतीला पोहोचणार होती. तसंच दिवाळीनंतर अनेकांनी या गाडीनं पुण्याला परत जाण्यासाठी आपलं तिकीट आरक्षित केलं होतं. मात्र ही गाडी आता रद्द करण्यात आल्यामुळं खानदेश, पश्चिम विदर्भातील प्रवासी चांगलेच अडचणीत आले आहेत. गंभीर बाब म्हणजे पुण्यावरून अमरावतीच्या दिशेनं येणाऱ्या खाजगी बसचे दर तिप्पट ते चौपट वाढले आहेत. आता ऐन दिवाळीत तेराशे रुपयांचे दर हे 5000 पर्यंत खाजगी बस संचालक वसूल करतात. शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावर अमरावतीला जाण्यासाठी निघालेले काही प्रवासी दुसऱ्या गाडीत चढले आणि त्यामुळं गाडीत प्रचंड गर्दी झाल्याचं एका प्रवाशानं ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय.
आम्ही दिलगिरी व्यक्त करतो : दरम्यान, यासंदर्भात रेल्वेच्या भुसावळ विभागाचे जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, ही विशेष गाडी नेमकी कशामुळं रद्द झाली या संदर्भात अद्याप मला माहिती मिळालेली नाही. याप्रकरणाची माहिती हाती येताच ती तात्काळ जाहीर केल्या जाईल. प्रवाशांच्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं देखील जीवन चौधरी यांनी म्हणाले.
हेही वाचा -