अमरावती-जून महिना सुरू होऊन आठवडा होत आला आहे. तरिही उन्हाच्या चटक्यात नरमाई आलेली नाही. मात्र, मान्सूपूर्व पावसाने अमरावती शहर आणि लगतच्या परिसरात बुधवारी हजेरी लावली. दुपारच्या सुमारास आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, उन्हाच्या चटक्यापासून काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
अमरावतीत मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस... शेतकऱ्यांना मात्र मान्सूनची प्रतीक्षा
अमरावती शहरात आज सकाळपासून दमट वातावरण होते. दुपारी 4 वाजता आकाशात ढग दाटून आले. दुपानंतर मुसळधार पावसाला सुरू झाली. अमरावती, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या भागात जोरदार पाऊस झाला.
अमरावतीत मान्सूपूर्व मुसळधार पाऊस.
अमरावती शहरात आज सकाळपासून दमट वातावरण होते. दुपारी 4 वाजता आकाशात ढग दाटून आले. दुपानंतर मुसळधार पावसाला सुरू झाली. अमरावती, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या भागात जोरदार पाऊस झाला. मात्र, त्याचवेळी अंजनगाव सुर्जी, अचलपूर, मेळघाट या भागात सूर्य तळपत होता. मंगळवारी देखील अमरावतीत अवकाळी पाऊस झाला असून शेतकरी आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.