महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत मान्सूनपूर्व सरी बरसल्या; शहरातील सर्व भागांत पावसाला सुरुवात - rain in amravati

मंगळवारी दुपारी शहरात अचानक पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा पसरला असून आता अमरावतीकरांना मान्सूनची प्रतीक्षा आहे.

monsoon in amravati
मंगळवारी दुपारी शहरात अचानक पावसाने हजेरी लावली.

By

Published : Jun 9, 2020, 7:34 PM IST

अमरावती - मंगळवारी दुपारी शहरात अचानक पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा पसरला असून आता अमरावतीकरांना मान्सूनची प्रतीक्षा आहे.

मंगळवारी दुपारी शहरात अचानक पावसाने हजेरी लावली.

निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यभरात मुसळधार पाऊस झाला. यानंतर आता पूर्वमान्सूनच्या सरी बरसत आहेत. उद्यापासून राज्यभरात मान्सून दाखल होणार असून ११ तारखेपर्यंत सक्रिय होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच १५ जूनपासून संपूर्ण राज्यात मान्सूनच्या सरी बरसणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. मराठवाडा आणि विदर्भात 11 तारखेपासून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

खरीप हंगामाची सुरवात झाल्याने मोठ्या प्रमाणात नांगरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी पहिल्या टप्प्यातील पेरण्यांची प्रक्रिया पूर्ण झालीय. या हंगामात तूर, कापूस, सोयाबीन, ज्वारी, सूर्यफूल आणि तृणधान्य घेण्यात येतात.

ABOUT THE AUTHOR

...view details