महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्त भागात खंडित झालेला विज पुरवठा लवकरच सुरळीत होईल -ऊर्जा मंत्री नितीन राऊत

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी व दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये विज वितरण कंपनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये खंडित झालेला विज पुरवठा लवकरच सुरळीत होईल, तसेच आता अंडरग्राऊंड पद्धतीने विज वाहिन्या टाकून विज पुरवठा करणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. राऊत हे अमरावती दौऱ्यावर आले असताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत
ऊर्जा मंत्री नितीन राऊत

By

Published : Jul 26, 2021, 8:53 PM IST

अमरावती - कोरोनासोबत युद्ध करत असताना कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी व दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये विज वितरण कंपनीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये खंडित झालेला विज पुरवठा लवकरच सुरळीत होईल, तसेच आता अंडरग्राऊंड पद्धतीने विज वाहिन्या टाकून विज पुरवठा करणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. राऊत हे अमरावती दौऱ्यावर आले असताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

पूर परिस्थितीमुळे विज वितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता अंडरग्राऊंड पद्धतीने विज वाहिन्या टाकून विज पुरवठा करणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. राऊत हे अमरावती दौऱ्यावर आले असताना, ते पत्रकारांशी बोलत होते.

'विज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान'

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी अंडरग्राऊंड विजेसाठी 3800 कोटी रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे आता नव्याने काम करावे लागेल अशी, माहितीसुद्धा नितीन राऊत यांनी दिली आहे. पूरामुळे विज वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पुढे असे नुकसान होणार नाही, ही काळजी घेऊ असेही राऊत यांनी सांगितले आहे. तर, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर ठिकाणाहून कर्मचारी मागवले आहेत, असेही राऊत म्हणाले आहेत. मंगळवारी महाड येथील दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आसून, इतर भागाचा दौरा कॅबिनेट बैठकीनंतर करू होईल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा -झारखंड सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न! बावनकुळेंमार्फत आमदारांना ५० कोटींची ऑफर दिल्याचा नवाब मिलक यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details