अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीफार्मचे छत उडाले, अनेक कोंबड्या दगावल्या - amravati rain news
अमरावती शहर परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये एका पॉल्ट्री फॉर्मचे छत उडाले असून काही कोंबडा दगावल्या.
अमरावतीत वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्रीफार्मचे छत उडाले
अमरावती -शहर आणि लगतच्या परिसरात रविवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शहरालगत बडनेरा पासून काही अंतरावर एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्म वरील छत उघडले असून त्यांच्या काही कोंबड्या दगवल्या आहे. तसेच केळीच्या बागेतील झाडे मुळापासून उपटून कोसळल्याने शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.
Last Updated : May 12, 2020, 5:44 PM IST