अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. यावेळी दहा जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले आहे.
मोर्शीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 10 जण ताब्यात
जुगाऱ्यांमध्ये मोर्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष व भाजप नेत्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व वाहने असा 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
जुगाऱ्यांमध्ये मोर्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष व भाजप नेत्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व वाहने असा 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गुप्त माहितीनुसार, मोर्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू मडावी, भारत धाकडे, संदीप वानखडे, आशिष काळे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी 10 जूनला संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान श्रीकृष्ण पेठ येथे एका घरात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. यावेळी शहरातील नामांकित व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.