महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२० कलमी मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन, पोलीस पाटील संघाचा इशारा - amravati news

राज्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे त्वरित भरण्यात यावी, सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६५ वर्ष करण्यात यावे, पेंशन योजना सुरू करावी, मानधन महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत.

police patil
२० कलमी मागण्या पूर्ण न केल्याचा आंदोलन, पोलीस पाटील संघाटा इशारा

By

Published : Feb 9, 2020, 10:05 PM IST

अमरावती - जिल्ह्यासह राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहे. या थकीत रकमेसह प्रवास भत्ता आणि इतर २० कलमी मागण्या शिवजयंतीपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करू, असा इशारा पोलीस पाटील संघाने दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.

२० कलमी मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन, पोलीस पाटील संघाचा इशारा

हेही वाचा - 'शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही'

राज्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे त्वरित भरण्यात यावी, सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६५ वर्ष करण्यात यावे, पेंशन योजना सुरू करावी, मानधन महिन्याच्या १० तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात यावे, या आंदोलकांच्या मुख्य मागण्या आहेत.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया, प्रकृती नाजूकच

पोलीस पाटील हा शासनाच्या प्रत्येक कामात मदत करण्यासह शासन आणि नागरिकांमध्ये दुवा म्हणुन काम करतो. गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते.

ABOUT THE AUTHOR

...view details