अमरावती - येथील रामपुरी कॅम्प परिसरात आयपीएलवर सट्टा लावणाऱया अड्ड्यावर आज (गुरुवारी) गाडगेनगर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत ३ मोबाईलसह १ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
अमरावतीमध्ये आयपीएल सट्ट्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, चौघांना अटक - अमरावती
येथील रामपुरी कॅम्प परिसरात आयपीएलवर सट्टा लावणाऱया अड्ड्यावर आज (गुरुवारी) गाडगेनगर पोलिसांनी धाड टाकली.
रामपुरी कॅम्प परिसरात नरेश भटेजा याच्या घरात सट्टा सुरू असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक देसाई, शेखर गेडाम, सतीश देशमुख, सारंग आदमने, विशाल वागपंजार यांनी सायंकाळी भटेजच्या घरावर धाड टाकली. यावेळी नरेश भटेज, प्रकाश ललवाणी, गिरीश चांदवानी, संतोष चांदवानी यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३६ हजार रुपयांचे ३ मोबाईल आणि १ लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.