अमरावती - दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. राज्यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती चालू आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्येही पाण्याचे भीषण संकट ओढावले आहे.
अमरावतीत ४० फूट खोल विहीरीत उतरून नागरिक भागवतायत तहान - drinking water
दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. राज्यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती चालू आहे.
स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यासाठी लोक ४० फूट खोल असणाऱ्या विहीरीत उतरत आहेत. अमरावतीतमधल्या सोनापूरमध्ये हे भयाण वास्तव आहे. मेळघाटमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र, शासनाचे याकडे कोणतेही लक्ष नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. काही ठिकाणी लोक पिण्यासाठी दुषीत पाण्याचाही वापर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
वर्षानुवर्षे पाण्यासाठी असाच संघर्ष करावा लागत असल्याचे सोनापूरमधल्या नागरिकांनी सांगितले. मात्र, आमच्याकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे.