महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील कपारीतल्या महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

उंच पहाडांवरून कोसळणार धबधबा आणि धबधब्यांच्या मागे कपारीत असणाऱ्या महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी उसळत आहे. धारणी तालुक्यातील गोलाई गावातील महादेव मंदिर हे मेळघाटातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

By

Published : Aug 5, 2019, 10:41 AM IST

कपारीतील महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अमरावती- धारणी तालुक्यातील गोलाई गावातील महादेव मंदिर हे मेळघाटातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील उंच कड्यांवरून कोसळणार धबधबा आणि धबधब्यांच्या मागे कपारीत महादेव मंदिर आहे. आज श्रावण सोमवार निमित्ताने महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

कपारीतील महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
गोलाई या गावात महादेवाचे एक छोटेसे हेमाडपंथी मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन काळापासून असून मंदिरापासून वाहणारी नदी ही महादेवाची नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी मंदिराच्या मागच्या बाजूल्या असलेल्या डोंगर कड्यावरून खाली कोसळते. या परिसरात दिवता मातेची मुर्ती आहे. दिवता माता म्हणजे पार्वती माता असल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. महादेवाच्या पिंडीवर बाराही महिने पाणी पडते. वरच्या बाजूला असणाऱ्या मंदिरालागत पूर्वी राणीचा महल होता. राणीला थेट महादेवाच्या कपारीतून चिखलदरा आणि नरनाळा किल्ल्यावर पोहोचता येईल, असे दोन भुयारी मार्ग या कपारीत आहेत. दोन्ही भुयारी मार्गात पायऱ्या आहेत. आता सुरक्षेच्यादृष्टीने मोठे दगड लावून हे भुयारी मार्ग बंद करण्यात आले असल्याचे येथील रहिवासी सांगतात.

अडीच हजार लोकवस्तीचे गोलाई हे गाव आहे. या गावात ५० वर्षांपूर्वी मेळघाटात भारतीय रेल्वेने अकोट ते खडवा ही रेल्वे लाईन सुरू करण्याचे काम हाती घेतले तेव्हा मराठवाड्यातील अनेक कामगार या परिसरात आले. त्यापैकी अनेक जण या भागात स्थायिक झालेत. यापैकी सुमारे दीड-दोनशे कुटुंब गोलाईत वसले आहेत. आम्ही या गावात येण्याआधीच फार प्राचीन काळापासून महादेवाचे मंदिर गावात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. श्रावण महिण्यात प्रत्येक सोमवारी मेळघाटातील आदिवासी, बिगर आदिवासी भाविक मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी येतात. गावात येण्यासाठी रस्ता चांगला आहे. मात्र, पूर्व मेळघाटात आमचे अखेरचे गाव असल्याने पुरेशी वाहतूक सेवा नाही. वाहतूक व्यवस्था योग्यपणे झाली तर भाविकांना मंदिरात येण्यासाठी सुविधा होईल अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details