महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोशल डिस्टन्सिंगसाठी स्वस्त धान्य दुकानदाराने लढवली 'अशी' शक्कल - अमरावती कोरोना न्यूज

अमरावतीच्या मोझरी गावातील दिनेश डहाके या रास्त धान्य दुकानदाराने शक्कल लढवत ग्राहकांना सात फूट अंतरावर उभे करून त्यांना पाईपद्वारे त्यांच्या पिशवीत धान्य दिले जात आहे.

सोशल डिस्टन्सिंगसाठी स्वस्त धान्य दुकानदाराने लढवली 'अशी' शक्कल
सोशल डिस्टन्सिंगसाठी स्वस्त धान्य दुकानदाराने लढवली 'अशी' शक्कल

By

Published : Apr 8, 2020, 6:20 PM IST

अमरावती- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणेग गरजेचे आहे. सध्या रेशन दुकानात धान्य आल्याने ग्राहक धान्य खरेदीसाठी झुंबड करतात. परंतु ही झुंबड टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्स कायम राहण्याची अमरावतीच्या मोझरी गावातील दिनेश डहाके या रास्त धान्य दुकानदाराने शक्कल लढवत ग्राहकांना सात फूट अंतरावर उभे करून त्यांना पाईपद्वारे त्यांच्या पिशवीत धान्य दिले जात आहे. त्यामुळे असा आदर्शवादी प्रयोग इतरही व्यावसायिकांनी करणे गरजेचे आहे.

सोशल डिस्टन्सिंगसाठी स्वस्त धान्य दुकानदाराने लढवली 'अशी' शक्कल

सध्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. परंतु अनेक लोक सोशल डिस्टन्सला पायदळी तुडवत दुकानात उभे राहतात.

दरम्यान सध्या ग्रामीण भागातील रेशन दुकानात धान्य खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करतात. यासाठी या व्यावसायिकाने सात फूट लांब पाईप आणून त्यात मोजलेले धान्य टाकून ते ग्राहकांच्या पिशवीत टाकल्या जाते. त्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यात अंतर राहते.

ABOUT THE AUTHOR

...view details