महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पातूर येथील सात कोरोनाग्रस्तांचे बडनेरा कनेक्शन; अमरावतीत खळबळ - पातूर

वाशिम येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या प्रवासाचा इतिहास पोलिसांनी तपासला असता तो व्यक्ती मरकझवरून बडनेराला आला आला होता. यावेळी त्याच्या संपर्कात बडेनराला आलेल्या पातूर येथील 15 जणांशी त्याचा संपर्क झाला असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. यानंतर अकोला पोलिसांनी पातूर येथील 15 संभाव्य कोरोना रूग्णांना ताब्यात घेऊन क्वारंटाइन केले होते.

patur corona patients connection to badnera
पातूर येथील सात कोरोनाग्रस्तांचे बडनेरा कनेक्शन; अमरावतीत खळबळ

By

Published : Apr 9, 2020, 2:57 PM IST

Updated : Apr 9, 2020, 3:53 PM IST

अमरावती- अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सात नवे रुग्ण आढळले आहेत. हे सातही रुग्ण पातूरचे असून काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तसोबत या सात जणांसह एकूण 15 जणांचा संपर्क बडनेरा येथे आला होता. पातूर येथील कोरोनाग्रसंतांचे कनेक्शन बडनेराशी जुळत असल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे.

वाशिम येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या प्रवासाचा इतिहास पोलिसांनी तपासला असता तो व्यक्ती मरकझवरून बडनेराला आला आला होता. यावेळी त्याच्या संपर्कात बडेनराला आलेल्या पातूर येथील 15 जणांशी त्याचा संपर्क झाला असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. यानंतर अकोला पोलिसांनी पातूर येथील 15 संभाव्य कोरोना रूग्णांना ताब्यात घेऊन क्वारंटाइन केले होते. यापैकी 7 जणांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पातूर येथे आढळलेले कोरोनाग्रस्त बडनेरा येथे वास्तव्याला होते. अमरावतीतील संभाव्य कोरोना रूग्णांचा चाचणी अहवाल येण्यास वेळ लागतो आहे.

दरम्यान, पातूर येथील या 7 कोरोनाग्रस्तांनी बडनेरावासियांना धडकी भरविली असून अमरावतीत खळबळ उडाली आहे.

Last Updated : Apr 9, 2020, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details