अमरावती- जिल्ह्यातील माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहुली ते गोरळा मार्गावरील करजगाव फाट्यावर कार व ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उषा राजेंद्र फुसे, असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
करजगाव फाट्यावर ट्रॅक्टरची कारला धडक, एकाचा मृत्यू
मृत उषा राजेंद्र फुसे, पती राजेंद्र फुसे, मुलगा तुषार फुसे चालकासह (एमएच-40-के-आर-5700) कारने शेगावमधून दर्शन घेऊन वरूडला जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरने कारला धडक दिली.
One dies in accident in Amravati
हेही वाचा -अमरावतीत 40 हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत उषा राजेंद्र फुसे, पती राजेंद्र फुसे, मुलगा तुषार फुसे चालकासह (एमएच-40-के-आर-5700) कारने शेगावमधून दर्शन घेऊन वरूडला जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरने कारला धडक दिली. उषा फुसे यांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत.