महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्नीचा मृतदेह काढायला लागले तब्बल ५८ तास; पतीचा मृतदेह शोधण्यासाठी SDRF ची टीम भिमकुंडातच - ganesh hekade

दिवसभर प्रयत्न केल्यानंतर या पथकाने रात्री ८ वाजता मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनी पत्नीचा मृतदेह बाहेर काढला, परंतु रात्री उशिरापर्यंत पतीचा मृतदेह हा दरीतच होता.

दरीत पडून दाम्पत्यांचा मृत्यू

By

Published : May 4, 2019, 7:33 AM IST

Updated : May 4, 2019, 9:02 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील चिखलदरा तालुका येथील शहापूर येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय कुस्तीपटूने आपल्या पत्नीसह १ मे ला चिखलदरा येथील २ हजार फूट खोल दरी असलेल्या भीमकुंडात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या ५८ तासानंतर मुबंईहून आलेल्या एसडीआरएफच्या पथकाला काल रात्री आठ वाजता पत्नीचा मृतदेह काढण्यात यश आले परंतु पत्नीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफची टीम अद्यापही भीमकुंडातच आहे.

दरीत पडून दाम्पत्यांचा मृत्यू

मृतदेह काढण्यासाठी बुधवारपासून पोलीस व स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. काल सकाळी १२ वाजता मुबंईवरून आलेल्या एसडीआरएफ टीमने रात्री पत्नीचा मृतदेह बाहेर काढला पण रात्री अंधार झाल्याने कार्यात अनेक अडचणी येत होत्या भीमकुंड ही दरी खोल असल्याने एसडीआरएफ (स्टेस्ट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) च्या पथकाला रात्री रस्ताच न मिळाल्याने हे पथक रात्रीपासून या भीमकुंडात अडकले आहे. गणेश हेकडे आणि राधा गणेश हेकडे या दाम्पत्याने घरगुती वादातून चिखलदारा येथील भीमकुंडात आत्महत्या केली होती. ते मृतदेह खोल दरीबाहेर काढण्यासाठी पोलिसांनी व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बुधवार गुरुवार या दोन्ही दिवस मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.

अशातच मृतदेह ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मधमाशांचे पोळ असल्याने पाच लोकांवर या मधमाशांनी हल्ला चढविला होता. हे सर्व प्रयत्न झाल्यानंतर मुबंईहून निघालेली एसडीआरएफचे पथक काल सकाळी १२ वाजता चिखलधार येथे दाखल झाले. भीमकुंड दरीचा आढावा घेतल्यानंतर रेस्क्यू पथकाने आपले काम सुरू केले. दिवसभर प्रयत्न केल्यानंतर या पथकाने रात्री ८ वाजता मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनी पत्नीचा मृतदेह बाहेर काढला, परंतु रात्री उशिरापर्यंत पतीचा मृतदेह हा दरीतच होता. रात्र झाल्याने व दरीबाहेर येण्याचा रस्ता दिसत नसल्याने एसडीआरएफचे पथक रात्रभर या दरीत अडकून पडले होते. आज पुन्हा हे पथक पतीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Last Updated : May 4, 2019, 9:02 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details