अमरावतीत दिड महिन्याच्या बाळाचे अपहरण
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजापेठ पोलिसांनी बाळाचे अपहरण करणाऱ्या अज्ञाताची शोधमोहीम सुरू केली आहे. परंतु, रात्री 9.30 वाजेपर्यंत पोलिसांना कुठलेही धागेदारे गवसले नव्हते.
अमरावती- अवघ्या दिड महिन्याच्या बाळाला एका अज्ञात व्यक्तीने घरातून उचलून नेऊन अपहरण केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 1.30 ते 2 वाजण्याच्या सुमारास न्यू प्रभात वसाहतीत घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजापेठ पोलिसांनी बाळाचे अपहरण करणाऱ्या अज्ञाताची शोधमोहीम सुरू केली आहे. परंतु, रात्री 9.30 वाजेपर्यंत पोलिसांना कुठलेही धागेदारे गवसले नव्हते.
बाळाचे वडील बिहारमध्ये
एकनाथपूरम जवळील न्यु प्रभात वसाहतीत राहणारे दिलीपसिंह चौहान यांना प्रणव नावाचा एक मुलगा आणि प्रियांका आणि नम्रता नावाच्या दोन मुली आहेत. नम्रताचे बिहारमधील छपरा जिल्ह्यात सासर असून तिचा पती मलेशसिंग हा पुणे येथे नोकरीला आहे, ते टाळेबंदीमुळे घरीच होते. सद्या ते बिहारमध्ये आहेत. नम्रता ही प्रसूतीसाठी आपल्या माहेरी न्यू प्रभात वसाहतीतील वडिलांकडे आली होती. प्रसूतीनंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. गेल्या दिड महिन्यांपासून ती वडिलांकडे राहत आहे. दरम्यान रविवार कुणीतरी अज्ञाताने घरातून तिच्या बाळाला उचलून नेले.
आजी आजोबा गेले होते लग्नाला
बाळाचे आजोबा दिलीपसिंह चौहान आज आजी जयश्री हे दुपारी 1 वाजता नावसरी परिसरात लग्नासाठी घरातून निघाले. ते 1.30 वाजेच्यासुमारास नावसरी परिसरात पोचताच त्यांना त्यांच्या घरातून बाळाला चोरून नेल्याबाबत माहिती मिळाली.