अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिवंत काडतुस व एक रिव्हॉल्वरसह एका आरोपीला अचलपूर पोलिसांनी अटक केली आहे. सल्लू उर्फ समीर भुरे खा नूर खा (३४ रा. इंदिरा कॉलनी, बैतुल, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रिव्हॉल्वर व पाच काडतूसांसह आरोपीला अटक, अचलपूर पोलिसांची कारवाई - Amravati
ल्लू उर्फ समीर भुरे खा नूर खा (३४ रा. इंदिरा कॉलनी, बैतुल, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीसह पोलीस अधिकारी
अचलपूर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल इंडिगो सीएस गाडीची तपासणी केली असता त्यामधून एक पिस्टल, पाच जिवंत काडतूस व दोन मोबाईल आढळून आले. यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपीविषयी माहिती मिळवताच सदर आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याच्याविरुद्ध इतरही गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. तर यामागे काही राजकीय हेतू आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.