अमरावती -केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) दुपारी माजी आमदार बी. टी. देशमुख यांच्या फ्रेंड्स कॉलनी येथील घरी सदिच्छा भेट दिली. बी.टी. देशमुख यांनी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग 5 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्रातील सिंचन अनुशेष विषयाचे देशमुख हे गाडे अभ्यासक आहेत.
नितीन गडकरींनी घेतली बी.टी. देशमुखांची सदिच्छा भेट - गडकरी बी टी देशमुख भेट
केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) दुपारी माजी आमदार बी. टी. देशमुख यांच्या फ्रेंड्स कॉलनी येथील घरी सदिच्छा भेट दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कौटुंबीक कामानिमित्त श्रीकृष्णपेठ येथे राहत असणाऱ्या त्यांच्या मामांच्या घरी आले आहेत. मामांच्या घरी येण्यापूर्वी नितीन गडकरी नागपूरवरून थेट बी.टी. देशमुख यांच्या घरी पोहोचले. यावेळी बी.टी. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सोमेश्वर पुसतकर, नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी, भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातुरकर उपस्थित होते.
प्रा. बी.टी. देशमुख यांनी नितीन गडकरींचेस्वागत केले. यानंतर नितीन गडकरी आणि बी.टी. देशमुख या दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटं चर्चा झाली. दुपारी 1 वाजता नितीन गडकरी यांच्या वाहनांचा ताफा श्रीकृष्णपेठ परिसराकडे निघाला. दरम्यान, या भेटीसह इतर कोणत्याही विषयावर भाष्य करणे नितीन गडकरी यांनी टाळले. बी.टी. देशमुख यांनी 'ते भेटायला आलेत बाकी काही नाही,' एवढे बोलून बाकी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.