अमरावती -प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात. आमदार बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे. पूर्णामाय येथील पुनर्वसन केंद्रात दिवाळी निमित्ताने अनाथ अपंग बांधवांना अभ्यंगस्नान घालून दिले आहे.
आमदार बच्चू कडूंनी दिव्यांगांसोबत फटाके फोडून केली दिवाळी साजरी - आमदार बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नेहमी चर्चेत असतात. आमदार बच्चू कडू यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे.
राजकीय नेते हे आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या आनंददायी सेलिब्रेशनसाठी व्यस्त आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी पूर्णामाय येथील पुनर्वसन केंद्र येथे जाऊन आपल्या अनाथ अपंग बांधवांना साबण उटणे लावून आंघोळ घालून त्यांना नवे चकचकीत कपडे परिधान करून दिले आहेत. त्याच्याबरोबर फटाके फोडून दिवाळीची सुरवात केली आहे. बच्चू कडू यांच्या कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. सध्या प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्ह्यात 2 आमदार आहेत. आधी प्रहारचे एकमेव आमदार असलेले बच्चू यांच्या प्रहार पक्षात मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी निवडणूक पूर्वी प्रवेश केला होता. आता ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने आता प्रहारचे 2 आमदार झाले आहेत.