महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवव्या दिवशीच आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवविवाहितेची आत्महत्या, कारण अस्पष्ट - कारण

अमरावतीमध्ये नऊ दिवसापूर्वीच आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

नवव्या दिवशीच आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवविवाहितेची आत्महत्या, कारण अस्पष्ट

By

Published : Apr 25, 2019, 11:11 PM IST

अमरावती- नऊ दिवसापूर्वीच आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आज (गुरुवारी) दुपारी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाणकापूर येथे ही घटना घडली. नवविवाहित तरुणीने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अश्विनी प्रमोद चवरे (वय २३) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.

आई-वडील नसलेल्या अश्विनी व प्रमोद चवरे यांचा १७ एप्रिलला विवाह झाला होता. दोघांचीही आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्रमोदच्या गावी दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांनी चिंचोली जाणकापूर येथील मंदिरात विवाह केला होता. तर आज दुपारी घरी कोणी नसताना अश्विनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details