अमरावती- शहरातील हिंदू स्मशान भूमीत दफन केलेल्या नवजात बाळाचा मृतदेह चोरीला गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अमरावतीमध्ये स्मशानभूमीतून बाळाच्या मृतदेहाची चोरी - अमरावती
आपल्या बाळाचा मृतदेह आहे की नाही? हे बघण्यासाठी अमोल नागपूरकर या स्मशानभूमीत बाळाला दफन केलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्याठिकाणी खड्डा खोदून बाळाचा मृतदेह काढून नेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
गेल्या २५ एप्रिलला मोती नगर परिसरातील रहिवासी अमोल नागपूरकर यांचे एक दिवसाचे बाळ दगावले होते. त्यांनी मृत बाळाचा अंत्यविधी त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता हिंदू समशनभूमीत केला होता. या स्मशान भूमीतील अस्थी चोरीला गेल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यामुळे आपल्या बाळाचा मृतदेह आहे की नाही? हे बघण्यासाठी अमोल नागपूरकर या स्मशानभूमीत बाळाला दफन केलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी त्याठिकाणी खड्डा खोदून बाळाचा मृतदेह काढून नेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी स्मशानभूमीत आक्रोश केला. या गंभीर प्रकाराबाबत हिंदू स्मशानभूमीच्या विश्वस्थांकडे त्यांनी विचारणा केली. तसेच या प्रकरणाची राजपेठ पोलिसांकडेही त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
यापूर्वीही या स्मशान भूमीत पुरलेल्या लहान बाळांचे मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला होता.