अमरावती- काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांना मते देण्यासाठी अमरावती विधानसभा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अविनाश मार्डीकर यांना वडाळी नाका परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष अविनाश मार्डीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हेही वाचा - विधानसभा निवडणूक Live : राज्यात आतापर्यंत ४३.८३ टक्के मतदान, पुण्यामध्ये दोन गटांत हाणामारी
वडाळी नाका परिसरात अविनाश मार्डीकर हे कारमध्ये बसून पैसे वाटत असताना कारच्या भोवती मोठा जमाव जमला असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांना संशय येताच त्यांनी चौकशी केली असता, मार्डीकर पैसे वाटत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मार्डीकर यांना ताब्यात घेऊन फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणले. वडाळी परिसरातही नागरिकांच्या म्हणण्यानुसार मार्डीकर यांनी 2 लाख रुपये वाटपासाठी आणले होते. तर पोलिसांनी मार्डीकर यांच्याकडे 35 हजार रुपये सापडल्याचे सांगितले आहे. मार्डीकर यांना पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवण्यात आले असून त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा - पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी; सहा जण जखमी