अमरावती -महानगराच्या सुरवातीला असलेल्या वेलकम पॉईंटला मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. या जागेला महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनपा प्रशासनाकडे सातत्याने केली जात होती. परंतू आजवर सभागृहात एकाही नगरसेवकाने तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याबाबीची दखल घेतली नाही.
अमरावती वेलकम पॉईंटला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वेलकम पॉईंटवर मनसेच्यावतीने महाराजांचे होर्डिंग
परिणामी १९ फेब्रुवारी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत मनसेच्यावतीने वेलकम पॉईंटच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे होर्डिंग लावण्यात आले. तसेच अमरावतीकरांनींही या जागेसाठी महाराजांच्या नावाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, शहर अध्यक्ष गौरव बांते, शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर, अजय महल्ले, विवेक्क पवार, सुरेश चव्हाण शहर सचिव निखिल बिजवे, राजेश धोटे धोटे,महेंद्र तराळ,विभाग अध्यक्ष सुरज बरडे, शैलेश सुर्यवंशी,धिरज तायडे, राम पाटील, मनसे शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे, मनसे शहर उपाध्यक्ष मयंक तांबुसकर, गौरव बेलुरकर, पवण लेंडे,उपस्थित होते.