महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेमडेसिवीरच्या काळा बाजाराविरोधात अमरावतीत रुग्णालयात मुंडन आंदोलन - अमरावती

अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजाराच्या विरोधात लढा संघटनेच्या वतीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात मुंडन आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख आणि जिल्हा अध्यक्ष योगेश लोखंडे यांनी मुंडन करून निषेध केला.

मुंडन आंदोलन
मुंडन आंदोलन

By

Published : May 22, 2021, 10:56 AM IST

अमरावती - जिल्ह्यात उघडकीस आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजाराच्या विरोधात लढा संघटनेच्या वतीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात मुंडन आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख आणि जिल्हा अध्यक्ष योगेश लोखंडे यांनी मुंडन करून निषेध केला. औषधांचा काळाबाजार करणारे आरोपी आणि त्यांच्या बचावासाठी प्रयत्न करणाऱ्यांना जन्मेठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

इंजेक्शनचा काळाबाजाराच्या विरोधात लढा
जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना अभय देणाऱ्यांच्या निषेधार्थ लढा संघटनेतर्फे तिवसा ग्रामीण रुग्णालयात मुंडन आंदोलन करण्यात आले.संपूर्ण जग कोरोना रोगाने ग्रस्त आहे त्यात अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. कोरोनाग्रस्तांना रेमडेसिवीर इंजेक्शन सारखे महत्वपूर्ण औषध वेळेवर न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यातच अमरावती जिल्ह्यात काही महाभागांनी रेमडीसीवरच्या वाटपाचा गैरप्रकार केला. पोलिसांनी त्या टोळीला अटक करून पर्दाफाश केला.परंतु, पोलिसांनी न्यायालयात त्यांना पोलीस कोठडी न मागितल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन त्याच दिवशी मंजूर केला. या संपूर्ण प्रकरणात राजकीय दबाव असल्याच्या चर्चा जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत.या संपूर्ण गैरप्रकाराचा निषेध म्ह्णून लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख आणि जिल्हा अध्यक्ष योगेश लोखंडे यांनी मुंडन करून निषेध केला.
लढा संघटना

ABOUT THE AUTHOR

...view details