महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रसह मध्यप्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

जिल्ह्यातील परतवाडापासून ७० किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला मुक्तागिरी धबधबा सद्या निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. नाग नदीवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून हजारो पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.

मुक्तागिरीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

By

Published : Aug 14, 2019, 10:57 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील परतवाडापासून काही किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला मुक्तागिरी धबधबा सद्या निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. नाग नदीवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून हजारो पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे.

मुक्तागिरीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

निसर्गाच्या सानिध्यात तसेच धबधब्यातून पडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तागिरीत पर्यटक गर्दी करत आहेत. येथील हिरव्यागार वनराईने व धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. तसेच या ठिकाणी जैन धर्मीयांचे श्रध्दास्थानसुद्धा आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरापासून काहीच अंतरावर सातपुडा पर्वतात अतिप्राचीन मंदिरालगत जवळपास २५० फूट उंचावरून मध्यप्रदेशातून वाहत येणारी नाग नदीची धार कोसळते. उंचावरून धबधब्याच्या रूपाने कोसळणारे पाणी त्याचप्रमाणे पाण्यातून उडणारे तुषार. या सर्वाचा आनंद पर्यटक घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details