अमरावती - मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुक्तागिरी येथील धबधबा प्रवाहित झाला आहे. हे ठिकान अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून अवघ्या १४ कि.मी अंतरावर असणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेत वसले आहे. हा निसर्गातील सुंदर देखावा सध्या पर्यटकांना खुणावतो आहे.
मुक्तागिरी येथील धबधबा पर्यटकांना खुणावतोय - सातपुडा पर्वत रांग
आठ दिवसांपूर्वी हा धबधबा प्रवाहित झाला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा वेग वाढला असून तो जोरात कोसळतोय. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील या धबधब्याचे पाणी मध्यप्रेशातील नद्यांमध्ये वाहून जाते.
मुक्तागिरी येथील धबधबा पर्यटकांना खुणावतोय
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील या धबधब्याचे पाणी मध्यप्रेशातील नद्यांमध्ये वाहून जाते. आठ दिवसांपूर्वी हा धबधबा प्रवाहित झाला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा वेग वाढला असून तो जोरात कोसळतोय. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यासह अनेक भागातील पर्यटकांची गर्दी होत आहे.