महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेड्डीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी संसदेत आवाज उठवणार - खासदार राणा - amravati latest news

हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या उपवनसंरक्षक शिवकुमार इतकेच अपर मुख्य उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीही जबाबदार आहे. या प्रकरणात रेड्डीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

Rana
भेटीचे छायाचित्र

By

Published : Mar 27, 2021, 7:32 PM IST

Updated : Mar 27, 2021, 10:36 PM IST

अमरावती -हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या उपवनसंरक्षक शिवकुमार इतकेच अपर मुख्य उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीही जबाबदार आहे. या प्रकरणात रेड्डीवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही हे दुर्दैव आहे. रेड्डीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आधी राज्यपालांकडे तक्रार करणार व नंतर संसदेत आवाज उठवणार, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. आज दीपाली चव्हाण प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार नवनीत राणा यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना भेटायला आल्या होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदार राणा

माझ्यासह पालकमंत्र्यांचे म्हणणेही प्रशासन ऐकत नाही

दीपाली चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी पतीसह घरी येऊन माझ्याकडे व्यथा मांडली होती. त्यानंतर शिवकुमार विरोधात कारवाई करा किंवा दीपाली चव्हाणची बदली करा, असे मी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांना सांगितले होते. मात्र, रेड्डीने दखल घेतली नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडेही हा विषय गेला होता. यशोमती ठाकूर यांनी सांगूनही रेड्डीने काही ऐकले नाही. खासदार आणि पालकमंत्र्यांचेही हे अधिकारी ऐकत नाहीत याबाबत खासदार नवनीत राणा यांनी रोष व्यक्त केला.

विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणाले योग्य कारवाई होणार

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांचे नाव दीपाली चव्हाण यांनी पत्रात लिहिले असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी विशेष पोलीस महानिरीक्षककांकडे लावून धरली. यावर बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी पोलीस उपअधीक्षक पातळीवर सुरू आहे. चौकशीत रेड्डीचा संबंध आढळला तर नक्की त्याला अटक करू आणि जर संबंध नसेल तर तसेही मी स्पष्ट सांगेल, अशे ते मीणा म्हणाले.

महिला वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मांडल्या व्यथा

विशेष पोलीस महानिरीक्षक मीणा यांनी महिला वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना रेड्डी बाबत काही सांगायचे असेल तर त्यांनी माझ्याशी बोलावे, असे म्हटले होते. त्यावर सात ते आठ महिला वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे भेट घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे शिवकुमार आणि रेड्डी यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी मांडल्या.

हेही वाचा -उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारचे होणार निलंबन; अपर प्रधान उपवन संरक्षकाची जिल्ह्यातून होणार हकालपट्टी

Last Updated : Mar 27, 2021, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details