महाराष्ट्र

maharashtra

नाशिक घटनेतील दोषीवर खुनाचा गुन्हा दाखल करा- नवनीत राणा

By

Published : Apr 21, 2021, 6:36 PM IST

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या मोठ्या टाकीला गळती झाल्याने ऑक्सिजन अभावी सुमारास 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा,अशी संतप्त प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

खासदार राणा
खासदार राणा

अमरावती - नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या मोठ्या टाकीला गळती झाल्याने ऑक्सिजन अभावी सुमारास 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी भंडारा येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा 11 बाळांंचा शॉट सर्किटमूळे मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी दोषीवर कारवाई केली गेली नाही ही कारवाई केली असती तर नाशिकची घटना आज (दि. 21 एप्रिल) घडली नसती, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

बोलताना खासदार राणा

तर नाशिक येथे घडलेल्या घटनेची चौकशी करून त्यांना निलंबित करून दोषीवर 302 म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करावा व मृत्यूच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची सरकारने मदत करावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली.

हेही वाचा-केंद्रावर टीका करण्यापेक्षा त्यांचे सहकार्य घ्या -नवनीत राणा यांचा मोलाचा मंत्र

ABOUT THE AUTHOR

...view details