महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीसंदर्भात खासदार नवनीत राणांनी घेतली राज्यपालांची भेट

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. दरम्यान, आज मंगळवारी त्या दोघांनीही राजभवन येथे राज्यपालांसोबत चर्चा केली. जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा, तसेच केंद्र सरकारने 25 हजार कोटी आणि राज्य सरकारने 25 हजार कोटींचा निधी देऊन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, ही मागणी केली आहे.

खासदार नवनीत राणांनी घेतली राज्यपालांची भेट

By

Published : Nov 5, 2019, 5:32 PM IST

अमरावती- गेल्या पंधरा दिवसांपासून अवेळी कोसळणाऱ्या संततधार पावसाने शेत पिकांचे मोठे नुकसान केले आहे. सोयाबिन, कपाशीसारख्या पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. दरम्यान, आज मंगळवारी त्या दोघांनीही राजभवन येथे राज्यपालांसोबत चर्चा केली. जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावी, तसेच केंद्र सरकारने 25 हजार कोटी आणि राज्य सरकारने 25 हजार कोटींचा निधी देऊन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, ही मागणी केली आहे.

खासदार नवनीत राणांनी घेतली राज्यपालांची भेट

राज्यात सर्वत्रच कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. खरीपाचे पीक कापणीनंतर हातातून गेले, तर रब्बी हंगामाची पेरणीचं होणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

खासदार नवनीत राणांनी घेतली राज्यपालांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details