महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravti Love Jihad बेकायदेशीर लग्न करुन तरुणीला डांबले, पुन्हा एक लव्ह जिहाद - अनिल बोंडे - Love Jihad In Amravati

धारणी येथील एका उच्च विद्याविभूषीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले होते. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. खासदार अनिल बोंडे Mp Anil Bonde Allegation About Love Jihad यांनी हे लव जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. मुस्लिमांनी आपली मुले संभाळावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही खासदार बोंडे Mp Anil Bonde Warn To People यांनी दिला आहे.

Mp Anil Bonde Allegation About Love Jihad
खासदार अनिल बोंडे

By

Published : Aug 31, 2022, 11:04 PM IST

Updated : Sep 7, 2022, 2:18 PM IST

अमरावती - तीन दिवस घरात डांबून ठेवल्यामुळे तब्येत खालावल्याने तरुणीला ग्रामीण रुग्णालयात Rural Hospital Amravati दाखल करण्यात आले. याप्रकरणी सदर तरुणीसोबत बेकायदेशीरपणे लग्न केले असून हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे Mp Anil Bonde Allegation About Love Jihad यांनी केला आहे. मुस्लिमांकडून हिंदूंच्या मुलींना सातत्याने लक्ष केले जात असल्याने डॉ. बोंडे यांनी आक्रमक होत मुस्लिम समुदायाला गंभीर इशारा दिला आहे. मुस्लिमांनी आपली मुलं सांभाळावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्हीही मागे हटणार नसल्याचा पवित्र बोंडे Mp Anil Bonde Warn To People यांनी घेतला आहे.

युवतीला तीन दिवस डांबून ठेवलेजिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका युवकाने येथील उच्च विद्याविभूषित तरुणीला प्रेमाच्या Highly Educated Girl Love affair जाळ्यात अडकवल्याचा प्रकार पुढे आला आहे. सदर युवकांने तीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतले. त्या तरुणीला तीन दिवस डांबून ठेवल्याने तिची प्रकृती ढासळली. हा संपूर्ण गंभीर प्रकार खासदार अनिल बोंडे Mp Anil Bonde Allegation About Love Jihad यांनी आज उघडकीस आणला. प्रकरणातील पीडित मुलीची प्रकृती खालावल्याने तिला बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात District Hospital Amravati उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी धाव घेत डॉ.बोंडे यांनी मुलीची व तिच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सर्वकष मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर दुसरीकडे डॉ. अनिल बोंडे Mp Anil Bonde Aggressive यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला असून मुस्लिमांनी आपली मुलं सांभाळावीत अन्यथा हिंदूही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देईल, असा दम सुद्धा त्यांनी भरला आहे.

२० प्रकरणातील मुली आहेत बेपत्ताजिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात लव्ह जिहादची Love Jihad प्रकरणे मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. विश्व हिंदू परिषद Vishwa Hindu Parishad व बजरंग दलाच्या Bajrang Dal पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने धारणी येथील प्रकाराला लगेच आळा घालण्यात यश आले. तर ग्रामीण पोलिसांची भूमिका सुद्धा या प्रकरणात संशयास्पद आहे. गत दोन वर्षात लव्ह जिहादच्या २० प्रकरणांमध्ये शेकडो मुली बेपत्ता झाल्या आहेत. अशा प्रकरणांवर वेळीच पायबंद घातला नाही तर त्यांचे जीवन उध्वस्त होईल. त्यामुळे पालकांनी सुद्धा अशा प्रकरणात सजग राहून काम करावे, मुलींनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सुद्धा खासदर अनिल बोंडे Mp Anil Bonde Appeal to People यांनी केले आहे.

Last Updated : Sep 7, 2022, 2:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details