महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रपतींच्या कामाचे श्रेय घेतात अडसूळ - माजी आमदार शेखावत - shekhawat

रावसाहेब शेखावत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात केलेल्या विकासाचे श्रेय लाटणाऱ्या व्यक्तीला आता त्यांच्या जिल्ह्यात परत पाठविण्याचे आवाहन केले.

आनंदराव आडसूळ

By

Published : Mar 26, 2019, 3:31 PM IST

अमरावती - शहराचा खरा विकास हा प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती पदावर असताना झाला. रेल्वे स्टेशन, अचलपूरची फिनले मिल प्रतिभाताईंनीच सुरू केली. न्यायालयाची भव्य इमारत उभारण्यात आली. मात्र, विद्यमान खासदार त्यांच्या या कामाचे श्रेय लाटत असल्याचा आरोप माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजपेठ चौक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह रिपाइंचे राजेंद्र गवई, शरद तसरे, सुनील वऱ्हाडे, किशोर बोरकर आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details