महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने गरिबांसाठी मोफत जेवणाची सोय - yuva swabhman party

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. अशा लोकांसाठी अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने गरिबांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे.

अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने गरिबांसाठी मोफत जेवणाची सोय
अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने गरिबांसाठी मोफत जेवणाची सोय

By

Published : May 14, 2020, 11:39 AM IST

Updated : May 14, 2020, 2:30 PM IST

अमरावती- लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहू नये, यासाठी शहरातील गरिबांसाठी युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने जेवणाची व्यवस्था केली आहे. दररोज एक हजार जण जेवण करतील, अशी सुविधा करण्यात आली आहे.

शहरातील राजापेठ परिसरात स्थित युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालय परिसरात गरिबांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या संकटाच्या काळात गरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये, या उद्देशाने एक हजार लोक दररोज जेवण करू शकतील अशी व्यवस्था केली असल्याचे युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आमदार रवी राणा म्हणाले.

अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने गरिबांसाठी मोफत जेवणाची सोय

शहरातील 42 हजार गरिबांच्या घरी आम्ही किराणा पोचविला असून आता सोशल डिस्टनिंगच्या माध्यमातून गरिबांसाठी जेवणाची व्यवस्था केली असल्याचे आमदार राणा म्हणाले.

Last Updated : May 14, 2020, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details