अमरावती - संयुक्त महाराष्ट्राच्या गोष्टी करता आणि विदर्भाला सावत्रपणाची वागणूक का देता? असा सवाल अपक्ष म यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. मागील सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री मध्येच बसून होते परंतु काल त्यांनी नुकसानीचा दौरा केला. केवळ दोन तासांमध्ये दौरा उरकून परत गेले. मातोश्री तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची केली आहे, अशी टीका देखील राणा यांनी केली.
'संयुक्त महाराष्ट्राच्या बाता मारता मग विदर्भाला सावत्रपणाची वागणूक का देता?'
संयुक्त महाराष्ट्राच्या गोष्टी करता आणि विदर्भाला सावत्रपणाची वागणूक का देता? असा सवाल अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे.
आमदार रवी राणा
अनेकांची शेती वाहून गेलेली आहे. घरांची पडझड झालेली आहे. त्यामुळे एक दिवसाचा दौरा न करता किमान मुख्यमंत्र्यांनी पंधरा दिवस महाराष्ट्राचा दौरा करावा, असे आमदार रवी राणा म्हणाले. एकीकडे संयुक्त महाराष्ट्राची भूमिका घेणारे मुख्यमंत्री विदर्भाला सावत्रपणाची वागणूक देतात, हे चुकीच आहे. असे रवी राणा म्हणाले. यावर्षी शेतकऱ्यांची दसरा, दिवाळी अंधारातच जाणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असा सल्लाही आमदार रवी राणा यांनी दिला आहे.